पुणे मॅरेथॉन 7 डिसेंबरला

November 12, 2008 6:20 PM0 commentsViews: 3

12 नोव्हेंबर पुणे23 वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन रविवार 7 डिसेंबरला होणार आहे.25 लाख रुपयांची रोख बक्षीसं असलेल्या या स्पर्धेत 23 देशातले 50 हजार धावपटू सहभागी होणार आहेत. रेस अगेंस्ट एड्स हे ब्रीदवाक्य असलेल्या या मॅरेथॉन स्पर्धेसोबत साडेचार किलोमीटरच्या एड्स चॅरिटी रनचंही आयोजन करण्यात आलंय. या चॅरिटी रनमधे नामवंत खेळाडू, आय टी कंपन्यामधले कर्मचारी, उद्योग-शिक्षण क्षेत्रातले दिग्गज सहभागी होणार असल्याची माहिती भारतीय ऑलिंपिक महासंघाचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी दिली.

close