रघुवीर घाटात दरड कोसळली ; 2 दिवस उलटून ही प्रशासनाचे दुर्लक्ष

June 28, 2011 4:04 PM0 commentsViews: 6

28 जून

कोकणातील खेड आणि सातारा जिल्ह्याला जोडणारा रघुवीर घाट गेल्या दोन दिवसांपासून बंद आहे. घाटात चार ठिकाणी दरडी कोसळ्ल्या आहे. यामुळे रस्त्यालाही मोठा प्रमाणावर भेगा पडल्या आहे. मात्र या दरडी हटवण्यासाठी प्रशासनाकडून अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही.

रस्ता बंद झाल्यामुळे घाटपायथ्याशी असलेल्या सातारा जिल्ह्यातल्या 14 गावांचा संपर्क खेड तालुक्यापासून तुटला आहे. दैनंदिन व्यवहारासाठी या गावांना खेड मध्येच यावं लागत असल्यामुळे घाट खुला झाला नाही तर 20 किलोमीटरची पायपीट करावी लागणार आहे. दरड हटवण्यासाठी रत्नागिरीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पाठवलेलं एक जेसीबी मशीनही घाटात बंद पडलं आहे. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालं आहे.

close