जे.डेंच्या हत्येच गूढ कायम

June 28, 2011 4:53 PM0 commentsViews: 4

सुधाकर कांबळे, मुंबई

28 जून

जे.डे यांची हत्या झाली त्या दिवशी म्हणजे 11 जूनला हल्लेखोरांनी त्यांचा आर सिटी मॉलपासून पिछा केला होता हे आता उघड झालं आहे. आणि आता याच दिवसाचे सीसीटीव्ही फूटेजही उपलब्ध झालं आहे. हे फुटेज पवईच्या डी मार्टमधील सीसीटीव्हीचे आहे. डी मार्टच्या समोरून जे.डे आपल्या बाईकवरुन जाताना या फुटेजमध्ये स्पष्ट दिसतं आहे. तर त्यांच्यामागे बाईकवरून दोन हल्लेखोरांनी पाठलाग करत आहेत. सीसीटीव्ही वरुन हे फुटेज मिळालं आहे.]

मिडे-डे चे क्राईम एडिटर जे.डे यांची हत्या गँगस्टर छोटा राजन याने घडवून आणल्याचे स्पष्ट झालं आहे. गेल्या काही महिन्यात मुंबईत झालेल्या गुन्हेगारी घडामोडीवर नजर टाकली असता छोटा राजन हा स्वत: सक्रिय झाल्याचं दिसून येतं आहे. मिडे डे चे क्राईम एडिटर जे.डे यांची गँग हत्या स्वत: छोटा राजन याने घडवून आणली. त्यासाठी त्याने पद्धशीर कट रचला. या प्रकरणी त्याच्या सात साथीदारांना अटक झाली.

छोटा राजनने कट कसा रचला आणि तो कसा अंमलात आणला गेला ते तर पोलिसांनी सांगितलं. पण महत्त्वाचे म्हणजे यासाठी स्वत: छोटा राजन काम करत होता. हा कट यशस्वी करण्यासाठी छोटा राजनने आपली सगळी यंत्रणा कामाला लावली. जे.डेंची हत्या करण्यासाठी प्रत्यक्ष शूटरची जमवाजमव करणे, हत्यारं मिळवणे, पैसे पुरवणे, रेकी करणे आणि कटाची अंमलबजावणी करण्यासाठी विश्वासू व्यक्तींची निवड करणे या सार्‍या गोष्टी परदेशात बसूनच छोटा राजनने घडवून आणल्या.

छोटा राजनचं मोठं नेटवर्क

- जुना साथीदार आणि कामात पक्का सतीश कालियाची निवड- शूटर्सपर्यंत पैसे पोचले बिनबोभाट- परदेशी बनावटीची हत्यारंही केली उपलब्ध- सतीश कालियाने केली रेकी- जवळचा साथीदार असूनही सतीश कालियाला ठेवलं अंधारात- सतीशने नाराजी व्यक्त केल्यावर त्याची नाराजी केली दूर

- जे.डे यांच्या हत्येचा कट पूर्णत्वास नेण्यासाठी गेल्या तीन वर्षापासून सक्रिय नसलेला पण कामात पक्का असणार्‍या सतीश कालिया याची छोटा राजननं निवड केली

- शूटर्सना हत्यारं घेण्यासाठी पैशाची गरज होती. छोटा राजनच्या माणसाने त्यासाठी चेंबूरमध्ये दोन लाख रुपये दिलेत- शूटर्संना हत्यार कुठे मिळेल हे छोटा राजननेच सांगितलं. एवढंच नव्हे तर त्यांची व्यवस्था केली. सतीश कालिया याला छोटा राजनने नैनिताल येथून परदेशी बनावटीचं हत्यार उपलब्ध करुन दिलं.

- यानंतर सतीश कालियाला रेकी करण्यास सांगितलं.

- आपला जवळचा साथीदार असतानाही छोटा राजनने सतीश याला कुणाला मारायचं आहे हे सांगितलं नाही. जे.डे. यांना मारल्यानतर सतीश कालिया याने स्वत: छोटा राजन याला फोन करुन नाराजी व्यक्त केली. त्यावेळी राजन ने तुला आणखी पैसे देतो,असं सांगितलं आणि त्यांला तीन लाख रुपये देण्याचे कबूल केलं. एवढचं नव्हे ते तीन लाख रुपये नालासोपारा येथे सतीश याला देण्यातही आले.

एका फोनवरुन छोटा राजनने सगळे काही घडवून आणले. आपली सगळी यंत्रणा राबवली आणि त्याने रचलेला कट त्याने यशस्वी केला.

close