मुंबईत छोटा राजन गँग पुन्हा सक्रिय !

June 28, 2011 5:25 PM0 commentsViews: 166

28 जून

गँगस्टर छोटा राजन हा मुंबईत काही ही करु शकतो याचं आणखी एक उदाहरण म्हणजे गँगस्टर दाऊद इब्राहीम याचा भाऊ इक्बाल कासकर याच्या बॉडीगार्डची हत्या. टेमकर मोहल्ला हा दाऊद इब्राहीम याचा बालेकिल्ला. या टेमकर मोहल्यात घुसून छोटा राजनच्या गुंडांनी इक्बाल कासकर याचा बॉडीगार्ड आरिफ शेख याला काही दिवसांपूर्वी ठार केलं. यासाठीही छोटा राजनची यंत्रणा राबली होती.

इक्बाल कासकर हा दाऊद याचा लाडका भाऊ. दाऊद याचं सर्व कुटुंब बाहेर आहे. मात्र हसीना पारकर आणि ईक्बाल हे दोघे केवळ भारतात आहेत. इक्बाल हाच सध्या दाऊदचा भारतातील व्यवहार बघत असल्याचं म्हटलं जातं.इक्बाल हा दाऊदच्या घरी म्हणजे टेमकर मोहल्लात राहतो. दिनांक 17 मे 2011 रोजी दोन हल्लेखोर थेट टेमकर मोहल्यात घुसले आणि त्यांनी इक्बाल राहत असलेल्या इमारतीच्या खाली उभा असलेला त्याचा बॉडीगार्ड आरिफ शेख याच्यावर हल्ला केला. या हल्यात आरिफ जागीच ठार झाला.

आरिफ वर हल्ला करणार्‍या दोन हल्लेखोरांना तत्काळ गर्दीने पकडलं. इंदर खत्री आणि सय्यद बिलाल अशी त्यांची नावं आहेत. तर या हल्याची सर्व तयारी छोटा राजनचा साथीदार उमेद याने केल्याचं नंतर स्पष्ट झालं होतं. तर हल्लेखोरांपैकी एक जण इंदर खत्री हा नेपाळचा राहणारा आहे.

या तपासात या हल्याचा कट परदेशात करण्यात आला हे उघड झालं. त्यावर अंमलबजावणीसाठी नेपाळचे मारेकरी निवडण्यात आले.आणि घटना मुंबईत घडवण्यात आली. आणि तीही दाऊदच्या घरात. मुख्य म्हणजे कट पूर्ण पणे यशस्वी करण्यात आला. केवळ हल्लेखोर पकडले गेल्याने सर्व काही तत्काळ उघडकीला आलं नाही तर पोलिसांना हल्ल्याच्या सूत्रधारापर्यंत पोहचणं केवळ अश्यक्य होतं.कासकरवरील हल्ल्यातही छोटा राजनच

- दाऊदचा भारतातील व्यवहार इक्बाल कासकरकडे- इक्बाल राहतो टेमकर मोहल्ल्यात- 17 मे, 2011 : दोन हल्लेखोर घुसले टेमकर मोहल्ल्यात- इक्बालच्या बॉडीगार्डची केली हत्या

- इंदर आणि सय्यद छोटा राजनचे शूटर्स- परदेशात बसूनच रचला कट

2008 साली छोटा राजन आयबीएन-लोकमतशी बोलला होता. त्यावेळी त्याने आपण कधीच कॉन्ट्रॅक्ट किलिंग केलं नसल्याचा दावा केला होता.

छोटा राजन कॉन्ट्रॅक्ट किलिंग14 फेब्रुवारी, 2008मी कधी कॉन्ट्रॅक्ट किलिंग केलेलं नाही. मला दाखवा की मी कधी पैशांसाठी कॉन्ट्रॅक्ट किलिंग केलंय. एक अशी घटना दाखवा की मी कधी पैशांसाठी कुणाची हत्या केली. सगळे खोटे आरोप आहेत. मी कधी Extortion वगैरे प्रकार करत नाही – छोटा राजन

छोटा राजनने दाऊदबद्दल काय म्हटलं होतं..

महाराष्ट्रात सत्ता आहे दाऊदची, ही तर हकीकत आहे. कारण दाऊदला राजकारणी आणि पोलीस म्हणजे काही राजकारणी आणि काही पोलीस मदत करतात. काही बिल्डर्सही आहेत. बाकी लोकं आहेत, एवढा पैसा आहे. दाऊदच्या आतंकला ते सपोर्ट करतात. पूर्ण देशामध्ये हे जाळं आहे. दाऊदची लोकं सगळीकडे आहेत. जिथे जिथे ब्लास्ट होतात, आतंक होतो, तिथे लॉजिस्टीकल सपोर्ट दाऊदचा असतोच असतो.

जे.डेंच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी सर्व आरोपींना देशभरातून अटक केली. हत्येमागे छोटा राजन टोळीचा हात असल्याचंही स्पष्ट झालं. मात्र ही हत्या का करण्यात आली याचं गूढ मात्र कायम आहे. जे. डेंचे मारेकरी आता जेलमध्ये आहेत. पण हत्येबाबत अजून काहीच माहिती मिळालेली नाही.

हे गूढ उकलण्यात पोलिसांना अजून यश आलं नाही. त्यामुळे हा तपास अर्धवट आहे असं म्हटलं जातंय. एका पत्रकाराच्या हत्येची सुपारी थेट छोटा राजन देतो. हे स्पष्ट झाल्याने त्याचे कारणही तेवढचे धक्कादायक असण्याची शक्यता आहे. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी अट्टल गुन्हेगार असल्याने त्यांच्याकडून माहिती काढायला उशीर लागेल असं पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांनी स्पष्ट केलं.

close