‘लोकपाल’च्या कक्षेत यायला तयार – पंतप्रधान

June 29, 2011 9:04 AM0 commentsViews: 2

29 जून

अखेर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपलं मौन सोडलं आहे. अण्णा हजारे यांचं उपोषण, बाबा रामदेव यांचं आंदोलन दडपलं जाणं आणि भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं बाहेर येऊनही पंतप्रधान गप्प आहेत असा विरोधकांचा आरोप होता. त्यामुळेच पंतप्रधानांनी नियमित संपादकांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानुसार ते आज राष्ट्रीय आणि प्रादेशिक भाषांतल्या संपादकांशी बोलले. लोकपालच्या कार्यकक्षेत पंतप्रधान कार्यालय आणायला आपण तयार आहोत. पण यावर मंत्रिमंडळ आणि मित्रपक्षाचे वेगवेगळी मतं असल्याचे पंतप्रधानांनी संपादकांशी बोलतांना सांगितलं. तसेच मंत्रिमंडळाच्या फेररचनेची तयारी सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं.

यावेळी पंतप्रधान काय म्हणाले, – मी लोकपालाच्या कक्षेत यायला तयार आहे. पण मंत्रिमंडळ आणि मित्रपक्षांत यावर मतभेत आहेत. – बाबा रामदेव यांची एअरपोर्टवर भेट घेण्यासाठी मंत्र्यांना पाठवण्याचा निर्णय मीच घेतला होता – अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या ऑफिसमध्ये हेरगिरी झाल्याचे पुरावे नाहीत – मंत्रिमंडळ फेरबदलाची प्रक्रिया सुरू झाली. – राहुल गांधींच्या पंतप्रधान होण्याच्या चर्चेवर बोलताना त्यांनी तरुण नेतृत्व पुढं आलं तर हरकत नसल्याचं म्हटलं – यूपीएतील सर्व घटकपक्ष एकत्र आहेत. कोणालाही आताच निवडणुका नको आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

close