एसटीची भाडेवाढ 8 ते 9 टक्क्याने होण्याची शक्यता

June 29, 2011 9:22 AM0 commentsViews: 3

29 जून

डिझेलच्या दरवाढीमुळे सामान्यांना आणखी फटका बसणार आहे. या दरवाढीमुळे एसटीच्या तिकीट दरात ही वाढ होण्याची शक्यता आहे. एसटीच्या तिकीट दरात जवळपास 8 ते 9 टक्क्यांनी वाढ होणार असल्याची माहिती एस.टी महामंडळाचे अध्यक्ष सुधाकर परिचारक यांनी दिली. डिझेल दरवाढीमुळे ही दरवाढ अटळ असल्याचं परिचारक यांनी म्हटलं आहे.

दरवाढीमुळे एसटी महामंडळाचे वर्षाला 128 कोटींचे नुकसान होणार आहे. एसटीला दरदिवशी 10 ते 11 लाख लीटर डिझेल लागतं. या दरवाढीमुळे दररोज 30 ते 33 लाखांचं नुकसान होण्याची शक्यता आहे.

close