सुरेश रैनाने केले नियमांचे उल्लंघन ; 25 टक्के फी कपात

June 29, 2011 1:36 PM0 commentsViews: 7

29 जून

भारतीय टीमचा बॅट्समन सुरेश रैना आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा दोषी आढळला आहे. बार्बाडोस टेस्ट मॅच दरम्यान पहिल्या दिवशी रैनाला अंपायरने आऊट दिल्यानंतरही तो क्रीजवर उभा होता. रैनाच्या मॅच फीसमधून 25 टक्के कपात करण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. रैनाला देवेंद्र बिशूने आऊट केलं होतं तर हा निर्णय असद रऊफ यांनी दिला होता. लक्ष्मण सोबत महत्वपूर्ण पार्टनरशिप करत रैनाने 53 रन्स केले. अंपायरने दिलेला निर्णय रैनासाठी दुदैर्वी ठरला. कारण रैनाच्या बॅटला किंवा पॅडला बॉल लागला नसल्याचे रिप्लेमध्ये दाखवण्यात आलं होतं.

close