क्रॉफर्ड मार्केटमधील इमारत कोसळून सहा जण ठार

November 12, 2008 4:55 PM0 commentsViews: 3

12 नोव्हेंबर मुंबईरोहिणी गोसावीमुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमधील सय्यद हाऊस ही धोकादायक नसलेली बिल्डिंग कोसळून एकाच कुटुंबातले सहा जण ठार झाले. यात दोन लहान मुलांचा समावेश आहे. या ठिकाणी मदतकार्यासाठी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या बोलावण्यात आल्या होत्या. सय्यद हाऊस ही बिल्डिंग धोकादायक म्हणू न घोषित केलेली नव्हती. पण ह्या बिल्डिंग शेजारी एका नविन बिल्डिंगचा पाया तयार करण्याचं काम सुरू आहे. त्याच्या हाद-यामुळे बिल्डिंगचा मागचा भाग कोसळला. सय्यद कुटुंबातल्या सहा जणांचा मृत्यू जीव हेलावून सोडणारा आहे. पण बिल्डिंग कोसळून मृत्यू पावणारं सय्यद कुटुंब हे एकटं नाही. या भागातअनेक बिल्डिंग अशा आहेत ज्या धोकादायक आहेत. तरीही हजारो कुटुंब आजही जीव धोक्यात घालून तिथं राहत आहेत. 13 ऑगस्ट 2008 ला भेंडी बाजारात बिल्डिंग कोसळून जवळपास 20 जण ठार झाले. 18 ऑगस्ट 2007 ला लॅमिंग्टन रोडवर 80 वर्ष जुनी असलेली बिल्डिंग कोसळून त्यात 7 जणांना मृत्यू झाला. 17 जुलै 2007 मध्ये बोरिवलीतील बिल्डिंग कोसळून 25 लोकांचा मृत्यू झाला होता. ती बिल्डिंग धोकादायक नव्हती. ज्यांनी ह्या शेजारच्या बांधकामाला परवानगी दिली त्यांची चौकशी करू असं महानगर पालिका आयुक्त, जयराज फाटक या दृर्घटनेविषयी म्हणाले.

close