रेव्ह पार्टी प्रकरणी रिसॉर्टचा मालकाची पोलीस चौकशी

June 29, 2011 10:03 AM0 commentsViews: 1

29 जून

रायगड जिल्ह्यातील खालापूरमधील रेव्ह पार्टीप्रकरणी माऊंट व्ह्यू रिसॉर्टचा मालक अपराजीत मित्तल याला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं आहे. पोलिसांनी या रिसॉर्टवर धाड टाकून ड्रग्ज आणि रोख रक्कम जप्त केली होती. याप्रकरणी 307 जणांना ताब्यात घेतलं होतं. त्यापैकी 5 जणांना 2 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. याच पार्टीत आयोजक आणि ड्रग्ज पुरवणार्‍यांना मदत केल्याप्रकरणी ऍन्टी नार्कोटीक्स विभागाचे पोलीस इन्स्पेक्टर अनिल जाधव यांनाही अटक झाली आहे.

close