..ती गाव 6 वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत

June 29, 2011 10:12 AM0 commentsViews: 8

29 जून

रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, कर्जत, खालापूर, आणि माणगाव या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर दुर्गम भाग आहे. यासर्व भागात डोंगरावर आणि डोंगराच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणावर गावे वसलेली आहेत. अशाच गावावर 26 जुलैच्या पावसात मोठी हानी झाली होती. जुई, कोंडिवते, दासगाव आणि रोहण या गावात दरड कोसळून 110 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सरकारने ही गावं हलवली जाणार असं सांगितलं होतं. पण यावर अंमलबजावणी झाली नाही. अजूनही हजारो कुटुंब आपला जीव मुठीत घेऊन राहत आहेत. पण शासन आता तरी अशा कुटुंबांचा विचार करणार का हाच खरा प्रश्न आहे.

close