नाशिकमध्ये 3 हजार विद्यार्थ्यांना केलं नापास

June 29, 2011 1:51 PM0 commentsViews: 4

29 जून

नाशिकमध्ये तृतीय वर्षात वाणिज्य शाखेतील तब्बल 3 हजार विद्यार्थ्यांना नापास करण्यात आलं आहे. विद्यापीठाच्या चुकीमुळे हा प्रकार झाला असल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. याच्या निषेधात त्यांनी पुणे विद्यापीठाच्या नाशिकमधील कार्यालयावर मोर्चा काढला. बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्कच्या पेपरमध्ये बहुसंख्य विद्यार्थ्यांना 17 ते 23 एवढेच मार्कस पडलेले दिसताहेत. यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या पुढच्या ऍडमिशन्सचा प्रॉब्लेम झाला. काहींना प्लेसमेंट द्वारे नोकर्‍या मिळूनही या गोंधळामुळे अडचण निर्माण झाली आहे. शिवाय री-चेकिंगचा चार्ज त्यांना नाहक भरावा लागत आहेत.

close