येवल्याजवळ ट्रक – काळी पिवळीची टक्कर 7 ठार

June 29, 2011 1:55 PM0 commentsViews: 10

29 जून

मनमाड – शिर्डी मार्गावर येवल्याजवळ वाळूचा ट्रक आणि काळी पिवळीची टक्कर झाली. या अपघातात 7 जण जागीच ठार तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये 3 पुरूष, 5 महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या 5 जणांना नाशिकच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

close