सुबोध भावे साकारणार संत तुकारामांची भूमिका

June 29, 2011 11:30 AM0 commentsViews: 6

29 जून

बालगंधर्व सिनेमाच्या यशानंतर निर्माते नितीन देसाई आणि अभिनेता सुबोध भावे ही जोडी पुन्हा एकदा रसिकांसमोर नवीन सिनेमा घेऊन येत आहे. रसिकप्रेक्षकांना गंधर्वयुगाची सफर घडवल्यानंतर आता ही जोडी संत तुकारामांच्या जीवनावर सिनेमा करण्याचा प्रयत्न करत आहे.

या सिनेमात तुकारामांची व्यक्तिरेखा सुबोध भावेच साकारणार असून संजय सूरकर सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. सिनेमाच्या पटकथेवर सध्या काम सुरू असून लवकरच या सिनेमाचे शूटिंग सुरू होणार आहे.

close