मुक्त विद्यापीठाची चक्क मुक्त कॉपी परिक्षा

June 29, 2011 11:44 AM0 commentsViews: 7

29 जून

मुक्त विद्यापीठ परिक्षेत जर कॉपी ही मुक्तपणे करायला मिळाली तर परिक्षा देणारे नक्कीच मेरिटमध्ये पास होतील. जळगावला सुरु असलेल्या जयपूर मुक्त विद्यापीठाच्या बी टेक परिक्षा वर्गात चक्क सामूहिक कॉपी सुरु आहे.

परिक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी असणारे सुपरवायझरंच त्यांना कॉपी करायला मदत करत आहेत. सर्व परिक्षार्थ्यांनी अर्थातच गाईड बेंचवर ठेवल्या होत्या. आयबीएनची टीम पोहोचल्यावर विद्यार्थ्यांची ताराबंळ उडाली. या गाईड बेंचखाली दडवण्याचा प्रयत्न सुरु झाला. पिंप्राळा भागातील ग्रामविकास विद्यालयात हा प्रकार सुरु होता.

सध्या या शाळेत जयपूर विद्यापीठाच्या इंजिनिअरिंगच्या परिक्षा सुरु आहे. उच्चशिक्षणाची डिग्री ही अनेक कारणांनी या परिक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना हवी आहे.आणि या सगळ्यांनाच जयपूर विद्यापीठाचा आधार हा महत्वाचा वाटतो. कारण खर्‍या अर्थाने मुक्त वातावरणात या परिक्षा सुरु आहे.

आयबीएन लोकमतची टीम या परिक्षा केंद्रावर पोहोचली आणि एकंच धावपळ सुरु झाली. सामूहिक कॉपीची चोरी लपवण्यासाठी या विद्यार्थ्यांना चक्क सुपरवायझरंच मदत करायला लागले.

मोबाईल वापराची बंदी असलेला फलक तर या परिक्षा केंद्राच्या आवारात तर फक्त नियम म्हणून लावलेला दिसला पण परिक्षा देणारे विद्यार्थी मात्र मोबाईलचा सर्रास वापर करीत होते. असं म्हणतात की, जयपूर विद्यापीठात विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला की हमखास पास होण्याची खात्री असते.

close