पुण्यातील बस स्थानकांजवळील कचरापेटी उपक्रमाचा बोजवारा

November 10, 2008 8:07 AM0 commentsViews: 1

10 नोव्हेंबर पुणेसिटिझन जर्नलिस्ट विवेक वेलणकरकॉमनवेल्थ युथ गेम्स च्या निमित्ताने पुणं सुशोभित करण्यासाठी अनेक योजना राबवण्यात आल्या. पाण्यासारखा पैसा यात ओतण्यात आला. याअंतर्गत बस स्थानकांजवळ कचरापेट्या बसवण्यात आल्या. पण काही दिवसातच या योजनेचा पुरता बोजवारा उडाला. अनेक कचरा पेट्यांची झाकणं गायब झाली, तर काही ठिकाणी कचरापेट्या उखडून टाकल्या आहेत.सिटिझन जर्नलिस्ट विवेक वेलणकर यांचा रिपोर्ट पुण्यातील कॉमनवेल्थ गेमच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले गेले होते. हे उपक्रम लॉग टर्मसाठी उपयोगात आणले जातील असं सांगण्यात आलं . त्यातलाच एक प्रत्येक बस स्टॉपशेजारी एक कचरापेटी ठेवण्यात आली. परंतु आता या कचरापेटीतला कचरा आठ-आठ दिवस उचलला जात नाही. तसंच या कचरापेटीत अन्नाबरोबर निर्माल्यही असतं. यासर्व कच-यामुळे तेथे दुर्गंधी पसरलेली असते. शेजारी बसस्टॉप आहे पण कच-याच्या वासामुळे कोणी प्रवासी तेथे बसेल कसा ?हया कचरापेटया दिवाळी अगोदर घाईघाईने बसवण्यात आल्या. परंतु आता हया कचरापेटयाची घाकणं गायब झाली आहेत. इथली ही दुरावस्था पाहून हळूहळू सर्व पेटया भंगारात जाणार हे निश्चित. पुण्यातील नागरिकांकडून कररुपाने मिळालेले पैसे अशाप्रकारे वाया जातात याचं हे उत्तम उदाहरण आहे. कचरापेटी सारखी अजून किती उपक्रम वाया गेले याची प्रकरणं आता हळूहळू बाहेर येतीलच

close