महागाईच्या मुद्द्यावर पंतप्रधान नापास – नितीन गडकरी

June 29, 2011 12:06 PM0 commentsViews: 5

29 जून

महागाईच्या मुद्द्यावर पंतप्रधान मनमोहन सिंग नापास झाले आहेत असा हल्लाबोल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केला. पंतप्रधानांनी आज संपादकांशी संवाद सादल्यानंतर नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषद घेतली.

आणि पंतप्रधानांनी महागाईसह वेगवेगळ्या मुद्द्यांवर केलेले युक्तिवाद खोडून काढले. यूपीए सरकारने महागाई आटोक्यात आणण्याचे आश्वासन देऊन जनतेची दिशाभूल केली असं गडकरी म्हणाले.

बाबा रामदेव यांची एअरपोर्टवर भेट घेण्यासाठी मंत्र्यांना आपणच पाठवल्याचे पंतप्रधानांनी कबूल केलं. पंतप्रधानांच्या इशार्‍यानुसारच रामलीला मैदानातील आंदोलन चिरडण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. काळा पैसा आणि भ्रष्टाचारावर बोलणं गुन्हा आहे का असा प्रश्नही नितीन गडकरींनी विचारला.

close