मुंडे वेटिंग लिस्टवरच !

June 29, 2011 2:27 PM0 commentsViews: 5

29 जून

भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे भाजपात राहिले असले. तरी त्यांच्यात आणि अध्यक्ष नितिन गडकरींमध्ये शितयुद्धाला आता नव्याने सुरवात झाली आहे. मुंडेंच्या विषयावर चर्चा करण्यासाठी 27 किंवा 28 जूनला बैठक घेऊ असं आश्वासन मुंडेंना सुषमा स्वराज यांनी दिलं होतं.

तशी घोषणाही त्यांनी केली होती. पण आज 29 तारीख गेली तरी बैठकीला मुहूर्त सापडत नाही. नाराज मुंडे मुंबईमध्ये या बैठकीच्या निमंत्रणाची वाट पाहात आहेत. तर नितीन गडकरींनी या विषयावर बोलण्याचे कटक्षाने टाळत आहे. त्यामुळे आता मुंडेंनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना पक्षाने वाटाण्याच्या अक्षता दिल्या की काय अशी चर्चा आहे.

close