अवघी जेजुरी सोन्याची होऊन गेली ; जेजुरीत माऊलींचा मुक्काम

June 29, 2011 2:49 PM0 commentsViews: 17

29 जून

ज्ञानोबा माऊलींची पालखी जेजुरीत पोचली ती भंडार्‍याची बहारदार उधळण अंगावर घेतच. सकाळपासूनच जेजुरीकरांना वाट होती ती माऊलींची पालखी कधी येतीये याची. मग ऐन मावळतीच्या वेळी माऊलींनी जेजुरीच्या शिवारात प्रवेश केला आणि खंडेरायाच्या या भूमीत एक आनंद आणि उत्साहाची लहरच पसरली. जशी पालखी पुढ सरकू लागली.

तशी खोबरं – भंडार्‍यांची एकच उधळण पालखीवर सुरू झाली आणि मग बघता बघता अवघी जेजुरी सोन्याची होऊन गेली. मानाचे अश्व, रथ, छत्र, अब्दागिर्‍या, मानकरी, वारकरी सगळे सगळे अगदी या सोनेरी भंडार्‍यात न्हाऊल निघाले. मल्हारी रायाच्या दर्शनाने ज्ञानिया धन्य झालेआणि ज्ञानियांच्या दर्शनाने अवघे जेजुरीकर….! या अभूतपूर्व स्वागतानंतर माऊलींच्या पालखीचा आजचा मुक्काम जेजुरीत आहे.

close