साखर निर्यातीच्या मुद्यावरून राज्य मंत्रिमंडळ दिल्लीत

June 30, 2011 10:21 AM0 commentsViews: 4

30 जून, दिल्ली

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पंतप्रधानांची भेट घेतली, आणि साखर निर्यात करण्याची मर्यादा वाढवण्याची मागणी केली . सध्या केवळ 5 लाख मेट्रिक टन साखर निर्यात केली जाऊ शकते, ती वाढवून 30 लाख मेट्रिक टनापर्यंत करावी अशी मागणी राज्यसरकारच्या वतीनं करण्यात आली. यंदा राज्यात साखरेचं 90 लाख मेट्रिक टन इतकं बंपर उत्पादन झालं आहे, त्यापैकी 15 लाख मे टन साखर तर उघड्यावर ठेवण्यात आली आहे. म्हणून निर्यातीची मर्यादा वाढवावी , आयात शुल्कही वाढवावं अशी मागणी राज्यसरकारनं केली आहे.या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील, दिलीप वळसे पाटील, हर्षवर्धन पाटील,विलासराव देशमुख, विजयसिंह मोहीते-पाटील उपस्थित होते.

close