मोनोरेलचा गर्डर कोसळला 2 जण ठार

July 2, 2011 9:19 AM0 commentsViews: 6

02 जुलै

चेंबूर-वाशी गावाजवळ मोनोरेलचे काम सुरू असताना गर्डर कोसळून दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन मजुर गंभीर जखमी आहे.जखमी मजुरांना राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

मोनोरेलचे काम सुरू असताना संध्याकाळी 65 टन वजनाचा गर्डर लोखंडी बार निसडल्यामुळे दुसर्‍या गर्डरवर आदळून कोसळला अशी माहिती प्रत्यक्षदशीर्ंनी सांगितले. मोनोरेल हा एमएमआरडीएचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. तसेच मोनोरेल मुंबईत या वर्षा अखेरीस धावणार अशी घोषणा ही एमएमआरडीएनं अलीकडेच केली होती. पण चेंबूर-वाशी गावाजवळ झालेल्या अपघातामुळे बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

close