राज्यपालांनी केलं प्रादेशिक अस्मितेचं समर्थन

November 13, 2008 4:44 AM0 commentsViews: 6

13 नोव्हेंबर, मुंबईराज्यपाल एच सी जमीर यांनी प्रादेशीक अस्मितेच्या मुद्याचं जोरदार समर्थन केलं आहे.मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळाला भेटल्यानंतर राज्यपालांनी एक प्रसिध्दीपत्रक जाहीर केलं. या पत्रकात हे विधान करण्यात आलं आहे. ' महाराष्ट्र राज्य हे भारतीय राष्ट्रवादाची मशाल असून देशातील सर्वात प्रगत आणि आधुनिक विचारांच राज्य आहे .राज्याची बदनामी करण्याचा कोणालाही अधिकार नाही ' असं राज्यपालांनी म्हटलं आहे. कायदा आणि सुव्यवस्था हा राज्याचा विषय आहे. बाहेरील लोकांना राज्याच्या अंतर्गत प्रश्नात ढवळाढवळ करण्याचा कोणताही अधिकार नाही ' असं राज्यपालांनी बजावलं आहे. मराठी आणि राज्याच्या जनतेची अस्मिता जपण्याचं राज्य सरकारचं कर्तव्य असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या भावना पोहोचवणार असल्याचंही त्यांनी आश्वासन दिलं.

close