धोतराच्या पायघड्या घालून तुकोबांच्या पालखीचे स्वागत

July 2, 2011 9:48 AM0 commentsViews: 14

02 जुलै

तुकोबांच्या पालखीचे काटेवाडीत जोरदार स्वागत करण्यात आलं. तुकोबांच्या पालखीचे आगमन म्हणजे काटेवाडीसाठी सणच होय. येथील परीट समाजाने शुभ्र धोतर वस्त्राच्या पायघड्या घालत पालखीचं स्वागत केलं. सकाळपासूनच पालखीची वाट पाहणार्‍या काटेवाडीकरांनी वेशीपाशी पालखी येताच एकच जयघोष करत पालखीला मिरवत आणलं.

त्यानंतर पालखीला खांद्यावर घेऊन काटेवाडीकरांनी वेशीपासून ते पालखीतळापर्यंत मिरवत नेलं. त्याआधी सकाळी रांगोळ्यांनी पालखीचा रस्ता सजवून काटेवाडीच्या महिलांनी पालखीच्या स्वागताची जोरदार तयारीही केली होती. आता पालखी थोडा विसावा घेईल आणि मग दुपारी अडीचच्या सुमारास प्रसिद्ध असं मेंढ्यांचं रिंगण रंगेल.

close