तुकोबांच्या पालखीत रंगलं मेंढ्यांचे रिंगण

July 2, 2011 5:07 PM0 commentsViews: 6

02 जुलै

तुकोबांच्या पालखीत आज काटेवाडीत मेंढ्यांचे बहारदार रिंगण रंगलं. सुमारे 400 ते 500 मेंढ्यांनी हे बहारदार रिंगण सजवलं. काटेवाडीत धनगर समाज मोठया प्रमाणात आहे. त्यामुळेच तुकोबांच्या पालखीभोवती रिंगण सजवण्याचा मान या धनगर आणि त्यांच्या मेंढ्यांना आहे.

आज तुकोबांच्या पालखीच काटेवाडीत जोरदार स्वागत करण्यात आलं. तुकोबांच्या पालखीचे आगमन म्हणजे काटेवाडीसाठी सणच होय. येथील परीट समाजाने शुभ्र धोतर वस्त्राच्या पायघड्या घालत पालखीचं स्वागत केलं.सकाळपासूनच पालखीची वाट पाहणार्‍या काटेवाडीकरांनी, वेशीपाशी पालखी येताच एकच जयघोष करत पालखीला मिरवत आणलं. त्यानंतर पालखीला खांद्यावर घेऊन काटेवाडीकरांनी वेशीपासून ते पालखीतळापर्यंत मिरवत नेलं. त्याआधी सकाळी रांगोळ्यांनी पालखीचा रस्ता सजवून काटेवाडीच्या महिलांनी पालखीच्या स्वागताची जोरदार तयारीही केली होती.

close