युपीतून सर्वाधिक पंतप्रधान झाले तरी लोंढे का निघतात – राज ठाकरे

July 2, 2011 10:57 AM0 commentsViews: 11

02 जुलै

देशाचे सर्वाधिक पंतप्रधान उत्तर प्रदेशातील झाले. पंडित जवाहरलाल नेहरू याचं उत्तरप्रदेश मधून निवडून आले. संजय गांधी,राजीव गांधी,सोनिया गांधी, राहुल गांधी हे याचं प्रदेशातून निवडून आले. तसेच अटलबिहारी वाजपेयी सुध्दा येथून निवडून आले आहेत.

देशाच्या पंतप्रधानाच्या गादीवर सर्वात जास्त पंतप्रधान जर या राज्यातून येत असतील आणि या राज्यातील लोक उठताय आणि दुसर्‍या राज्यात शिरणार आणि त्या राज्याच्या डोक्याला ताप बनणार हे शोभणीय नाही. असं सांगत परप्रांतियांचे सर्वाधिक लोंढे का निघतात हा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप नेते राजनाथसिंग यांना केला. नाशिकमध्ये राज ठाकरे बोलत होते.

पंतप्रधान आणि उत्तरप्रदेश याचं नातं याचा खुलास करत राज ठाकरे यांनी मुंबईचा उल्लेख मुंबईच झाला पाहिजे, याचीही त्यांनी पुन्हा एकदा आठवण करुन दिली. नाशिक झपाट्याने विकासित होणारे शहर आहे. पण या विकासाबरोबरच लोकांनाही सर्व मूलभूत सोयी मिळाल्या पाहिजे असंही राज ठाकरे यांनी मत व्यक्त केलं.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौर्‍यावर आले आहे. खरं तर मनसे आणि नाशिक यांचं एक वेगळं नातं आहे. नाशिककरांनी मनसेला सर्वाधिक मतं दिली. 12 नगरसेवक निवडून दिले 3 आमदार निवडून दिले आहेत.

close