अखेर ‘विस्डम’ हटवा मोहिम फत्ते

July 2, 2011 11:15 AM0 commentsViews: 6

02 जुलै

मुंबईतील जुहू चौपाटीवरून विस्डम या जहाजाची अखेर सुटका करण्यात आली आहे. दोन टग बोटीच्या साह्याने खोल समुद्रात या जहाजाला ओढत नेण्यात कोस्ट गार्डला अखेर यश आलंय. आज दुपारी 12 वाजता आलेल्या भरतीदरम्यान हे जहाज खेचून नेण्यात आलं. तब्बल 21 दिवसानंतर या जहाजाला बाहेर काढण्यात आलं आहेत. या अगोदर देखील चार वेळा हे जहाज भरतीच्या वेळी समुद्रात खेचण्याचे प्रयत्न झाले होते. अखेर आज कोस्ट गार्डच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने जुहू चौपाटी आता मोकळी झाली आहे.

close