मी निर्दोष मारियाचा दावा

July 2, 2011 2:13 PM0 commentsViews: 3

02 जुलै

मी निर्दोष आहे माझ्यावर केलेले आरोपांमध्ये तथ्य नाही. नीरज ग्रोव्हर हत्याप्रकरणी मला काही बोलायचे नाही मी भुतकाळ विसरली आहे. मी पुढे काय करायचे याचा मी विचार केला नाही पण मला नीरज प्रकरणावर काही बोलायची इच्छा नाही असं स्पष्ट मत मारिया सुसईराजने पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं. मात्र या पत्रकार परिषदेत नीरजच्या मित्रांनी जोरदार निदर्शन केली.

मारियाचे वकील शरीफ शेख यांनी पत्रकार परिषदेत मारियाची बाजू मांडत असताना मारिया कोणत्याही चित्रपटात जाणार नाही असं स्पष्ट करत नीरज ग्रोव्हर हत्याकांड प्रकरणात नवा खुलासा केला. जेरोमने नीरजची हत्याकरून मारियाला धमकी दिली होती. आणि पोलिसांनी नीरज हत्याकरून 300 तुकडे केले होते. हा पोलिसांचा दावा खोटा आहे आपल्याकडे असलेला नीरजची हत्या ज्या ठिकाणी झाली होती त्याची छायाचित्र मीडिया समोर सादर केली. नीरजची 300 तुकडे करण्यात आलीच नाही असा दावा मारियाच्या वकिलांनी केला.

नीरज ग्रोव्हर हत्याप्रकरणी मारिया सुसईराजची आज भायखळा जेलमधून सुटका झाली. नीरज ग्रोव्हर हत्येप्रकरणी सेशन कोर्टाने मारियाला 3 वर्षांची शिक्षा सुनावली होती. मारिया 2008 पासून तुरुंगात होती. मारियाची 3 वर्षांची शिक्षा पूर्ण झाली. त्यामुळे तीची सुटका करण्यात आली. तिनं 50 हजारांचा दंडही भरला. तर तिचा प्रियकर आणि माजी नौदल अधिकारी एमिल जेरोमला 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. जेरोमला अजून 7 वर्षं तुरुंगात काढावी लागणार आहेत.

close