लोकपालचा सर्वसामान्यांना काहीही फायदा नाही – संजय राऊत

July 3, 2011 9:50 AM0 commentsViews: 1

03 जुलै

अण्णा हजारे यांनी लोकपाल बिलासाठी जो लढा सुरू केला आहे तो सर्वसामान्यांना काहीही फायदा नाही अशी टीका शिवेसना खासदार संजय राऊत यांनी केली. नवी मुंबईत झालेल्या शिवशक्ती-भीमशक्ती मेळाव्यात ते बोलत होते. त्यांनी अण्णा हजारेंवरही टीका केली. अण्णा हजारे सामान्य माणसांच्या प्रश्नांबद्दल बोलत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मात्र अण्णा हजारेंवर टीका करणार्‍या शिवसेनेनं अण्णांच्या जंतरमंतरवरच्या आंदोलनाला पत्रक काढून पाठिंबा दिला होता. आणि आता मात्र शिवसेनेने आपली भूमिका बदलली आहे.

close