सनातनचा तपासयंत्रणांवर राजकीय दबाव

November 13, 2008 7:12 AM0 commentsViews: 3

13 नोव्हेंबर, रायगडविनय म्हात्रेसनातन या दहशतवादी संघटनेवर आता बंदीची मागणी जोर धरू लागली आहे. आपलं पितळ उघड झाल्यामुळं आता या संस्थांनी राजकीय पक्षांची मदत घेतली आहे. यातूनच ते सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. पण या प्रयत्नांमुळेच सनातनचा मुख्य केंद्रबिंदू असलेल्या रायगड जिल्ह्याची राजकीय समीकरणं बदलणार आहेत.पनवेल इथं सनातन संस्थेच्या साधकांची मोठी संख्या आहे. या संघटनेच्या एकूण कामकाजावर स्थानिकांनी आक्षेप घेतला होता. पण आता राजकीय पक्षही या संस्थेच्या कामकाजावर उघडपणे बोलू लागले आहेत. ' सिमीवर बंदी घातली गेली तर सिमीप्रमाणे काम करणार्‍या संघटनाना वेगळा न्याय देणं चुकीचं आहे. त्यांना पाठिंबा देणारेही गुन्हेगार असल्याच समजायला हरकत नाही. ' असं रायगडचे माजी खासादार रामशेठ ठाकूर यांनी सांगितलं.या संघटनांना वाचवण्यासाठी अनेक राजकीय पक्ष मैदानात उतरले आहेत. पण रायगड जिल्ह्यातली मतदारांची संख्या पाहता मुस्लीम मतदार हा महत्वाचा ठरतो. मागील काही काळापासून रायगड जिल्ह्यातला मुस्लीम मतदार काँग्रेस पासून दुरावला होता.आता सनातन हिंदू दहशतवादाच्या कारवायांमुळे पुन्हा काँग्रेसकडे वळतोय. दरम्यान एटीएसच्या जाळ्यातून आपली सुटका व्हावी. यासाठी सनातन संस्थेच्या सदस्यांनी शहरात शहरात दिंड्‌या काढल्या. पनवेलमध्येही अशी दिंडी काढण्यात आली. यात शिवसेना, भाजप आणि शेतकरी कामगार पक्षाचाही सहभाग होता. सनातनच्या दहशतवादी कारवाईनंतर काँग्रेस आणि रा़ष्ट्रवादी या राजकीय पक्षांनी सनातनच्या विरोधात भूमिका घेतलीय. तर शिवसेना भाजपनं सनातनला मदतीचा हात पुढं केला आहे. राज्यात दहशत माजवणार्‍या सनातनने रायगड जिल्ह्यातील राजकीय पातळीवरही चांगलीच दहशत माजवल्याचं यानिमित्तानं स्पष्ट झालं आहे.

close