लोकपाल संदर्भात उद्या सर्वपक्षीय बैठक ;शिवसेना अनुपस्थित ?

July 2, 2011 3:26 PM0 commentsViews: 1

02 जुलैलोकपाल विधेयकासंदर्भात आपली भूमिका ठरवण्यासाठी आज एनडीएच्या घटक पक्षांची बैठक पार पडली. याच संदर्भात उद्या एक सर्वपक्षीय बैठक होत आहे. या सर्वपक्षीय बैठकीत शिवसेना अनुपस्थितीत राहणार आहे. पण भाजपाने मात्र या बैठकीत सहभागी होण्याचं ठरवलं आहे. आपल्यालाही एक चांगलं लोकपाल विधेयक हवं असल्याकारणाने आपण या बैठकीत सहभागी व्हायचं ठरवलं असल्याचं अडवाणी यांनी म्हटलं आहे. तसेच बैठकीला उपस्थित राहण्यासाठी शिवसेनेचंही मन वळवण्याचा आपण प्रयत्न करू असंही अडवाणी यांनी म्हटलं आहे.

close