क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत राजकारण आणू नये – शरद पवार

July 3, 2011 10:02 AM0 commentsViews: 4

03 जुलै

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीचं वातावरण आता तापायला लागलं आहे. पण या निवडणुकीत राजकारण आणु नये, मी कधीही माझ्या पक्षाचा उपयोग यासाठी केला नाही या पुढेही करणार नाही असं मत आयसीसीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं. ठाणे इथं झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. दिलीप वेंगसरकर यांना शिवसेनेनं पाठिंबा जाहीर केला. त्यावर पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली. पण स्वत: निवडणूक लढवण्याबाबत मात्र त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही.

close