अण्णांनी पवार, भुजबळांची प्रकरण बाहेर आणावी – राज ठाकरे

July 2, 2011 4:29 PM0 commentsViews: 1

02 जुलै

अण्णा हजारे यांनी लोकपाल विधेयकाचा विषय बाजूला ठेवावा आणि अण्णांनी पहिलं महाराष्ट्राकडे लक्ष द्यावं अण्णांनी जर अजित पवारांच्या खात्यातील, छगन भुजबळ यांच्या खात्यातील प्रकरण जर बाहेर काढत असतील तर अख्ख्या महाराष्ट्राची संपूर्ण ताकद अण्णांच्या पाठीशी उभी करीन असं आवाहन राज ठाकरे यांनी दिलं. राज ठाकरे नाशिक येथे बोलत होते.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौर्‍यावर आहे. आज संध्याकाळी मनसेच्या कार्यालयाचे उध्दघाटन सोहळा पार पडला यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना राज ठाकरे यांनी चौफेर फटकेबाजी केली. परप्रांतीयांचे येणारे लोंढे आता राज्यातल्या प्रगतीपथावर असणार्‍या शहरात म्हणजे नाशिक, पुणे,औरंगाबाद येथे भरला जात आहे.

किती लोक येत आहे याचा अंदाज नाही. आले की भरले. यामुळे आपण आपली भाषा विसरत चाललो आहे. आणि या सर्व राड्यात उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती आल्या होत्या आणि म्हणे, उत्तरभारतीयांना घरे देण्यात यावी. यांना घर देण्यासाठी महाराष्ट्र राज्य हे काय बापाचा माल लागला का ? असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. मायावती कोणत्याही राज्यात जाऊन मागणी करत नाही आपल्या राज्यातच येऊनच मागणी करता.

असं सांगत राज ठाकरे यांनी आपला मोर्चा शरद पवार यांची 'कल्पना' लवासा सिटीकडे वळवला. धरणाचं पाणी अडवून शहराला पाणी पुरवढा होऊ न देणे याला काय म्हणावे. शरद पवारांना पुढच्या गोष्टीचा विचार आहे की नाही असा टोला राज यांनी लगावला.यानंतर थेट राज यांनी अण्णा हजारे यांच्याकडे सर्वांच्या साक्षीने मागणी घातली जर अण्णांनी अजित पवार, छगन भुजबळ यांच्या खात्यातील भ्रष्टाचाराची प्रकरण बाहेर काढली तर अख्ख्या महाराष्ट्राची ताकद अण्णांच्या पाठीशी उभी करीन असं आवाहन राज यांनी दिलं. मात्र अण्णांनी मला उपोषण करायला सांगू नये एक तर माझी तब्येत अशी त्यात जर उपोषण केलं तर मग माझं काही खरं नाही. असं मिश्किल टिप्पणी ही केली.

इतर बातम्या

युपीतून सर्वाधिक पंतप्रधान झाले तरी लोंढे का निघतात – राज ठाकरे

close