चांदोबाचा लिंब येथे रंगलं माऊलींचं उभं रिंगण

July 2, 2011 5:02 PM0 commentsViews: 21

02 जुलै

सातारा जिल्ह्यातील चांदोबाचा लिंब इथं आज माऊलींच्या पालखीत उभं रिंगण पार पडलं. दुपारनंतर लिंबापाशी एक एक दिंड्या जमू लागल्या तसा वारकर्‍यांचा उत्साह ही वाढत होता. माऊलींची पालखी दिसताच माऊली. माऊलीचा एकच गजर वारकर्‍यांनी केला. त्यानंतर मानाच्या अश्वांनी दौड करताच वारकर्‍यांचा उत्साह शिगेला पोहोचला. दुतर्फा उभ्या असणार्‍या वारकर्‍यांच्या मधून अश्वांनी दौड करत मग हे उभं रिंगण सजवलं

close