‘छत्रपती’वडापावच्या नावाला उदयनराजे भोसले यांचा आक्षेप

July 3, 2011 11:38 AM0 commentsViews: 91

03 जुलै

नितेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनेनं शिववडयाला आव्हान देण्यासाठी छत्रपती वडापावचे स्टॉल्स सुरू केले आहेत. एकीकडे वडापावचे खमंग राजकारण पेटलं असताना आता यावरुन नवीन वाद निर्माण झाला आहे. स्वाभिमान संघटनेनं वडापावला दिलेल्या 'छत्रपती' या नावालाच आता उदयनराजे भोसले यांनी आक्षेप घेतला आहे. वडापावसाठी छत्रपती नावाचा वापर थांबवा नाही तर कोर्टात खटला दाखल करु असा इशारा उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.

close