नीरज हत्याकांड प्रकरणी मालाडमध्ये कॅन्डल मार्च

July 3, 2011 12:13 PM0 commentsViews:

03 जुलै

नीरज ग्रोव्हर हत्याकांड प्रकरणी कोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात आज नीरजच्या मित्र परिवाराने निदर्शन केली. तसेच कॅन्डल मार्च काढला. परवानगीशिवाय निषेध मोर्चा काढणार्‍या नीरज ग्रोव्हरच्या मित्र आणि परिचितांना पोलिसांनी आधी ताब्यात घेतलं. पण नंतर त्यांना सोडून देण्यात आलं. यानंतर त्यांनी पुन्हा मोर्चा काढला. काल मुंबई पोलिसांनी या निषेध मोर्चाला परवानगी नाकारली होती. कालही मारिया सुसईराजच्या पत्रकार परिषदेत नीरजच्या मित्रांनी घोषणाबाजी केली होती.

close