समाजात आरक्षणाबाबत जागृती होण्यासाठी दुचाकीवर अनोखा दौरा

July 3, 2011 12:25 PM0 commentsViews: 7

03 जुलै

मातंग समाजात आरक्षणाबाबत जागृती व्हावी यासाठी या समाजातलाच एक तरुण बाळासाहेब तुपसुंदरे संपूर्ण राज्याच्या दौर्‍यावर निघाला आहेत. लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तो हा प्रवास बाईकच्या एका बाजूला बसून करतोय. 1 मेपासून त्यांने दौरा सुरू केला आहे. दौर्‍यादरम्यान त्याने 35 ते 40 हजार समाज बांधवांशी संवाद साधला आहे.

एका बाजूने बसून बाईक चालवता यावी यासाठी त्याने गेअर्स आणि ब्रेक उजव्या बाजूला बसवून घेतले. तो डावा हात आणि डाव्या पायाने बाईक चालवतो. एवढंच नाही तर गाडी चालवता चालवता पत्रही लिहतो.

त्याला या सर्व करतबी सहजशक्य होतात कारण तो मल्लखांबचा राष्ट्रीय खेळाडू आहे. बाळासाहेबा तुपसुंदरे या तरूणाने इतिहास या विषयात एम. एची पदवी मिळवली आहे.

मातंग समाजातला बाळासाहेब उच्च विद्याविभूषित आहे. मातंग समाज हा उपेक्षित आहे. त्यांचा विकास व्हायचा असेल तर त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे असं बाळासाहेब यांचं मत आहे.

close