पावसाळ्यात ताडोबा अभयारण्य बंद

July 3, 2011 2:50 PM0 commentsViews: 129

03 जुलै

पावसाळा हा वन्य प्राण्यांचा प्रजननाचा काळ असल्यामुळे पावसाळ्यात सर्व अभयारण्य बंद असतात. मात्र ताडोबा अभयारण्य पर्यटकांसाठी खुलचे असायचं आणि पावसाळ्यातही जिप्सी सफारी सुरू असायच्या. व्यवसायावर परिणाम होईल या भीतीने हा प्रकल्प बंद ठेवायला जिप्सी चालक संघटना आणि वन्य जीव संरक्षकांनी विरोध ही करत असतं.

ताडोबाचे वनसंरक्षक डॉ.सिन्हा पावसाळ्यात अभयारण्य बंद ठेवावे हा प्रस्ताव पाठवला होता. हा प्रस्ताव आता मंजूर झाला असून प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी ताडोबा अभयारण्य पर्यटकांना तीन महिने बंद ठेवण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे 15 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधील हा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे. ताडोबा सुरू झाल्यापासून प्रथमच या कालावधीत प्रकल्प पर्यटकांसाठी बंद राहण्याची घटना घडत आहे.

close