अन् आपला फोटो पाहून वारकरी सुखावला

July 3, 2011 7:31 AM0 commentsViews: 4

03 जुलै

तुम्हाला वारिला जाता येणं शक्य नसेल तर हा वारिचा सोहळा तुम्हाला घर बसल्या पाहता यावा म्हणून आम्हीही वारीमध्ये सहभागी होऊन तिथला भक्तीरंग तुमच्यापर्यंत थेट पोहचवतो. गेल्या तीन वर्षात आम्हाला अनेक वारकरी भेटले. आणि यातले काही चेहरे आम्हाला अनपेक्षितरित्या या वर्षी पुन्हा भेटले.

आणि याकरता आमच्यासोबत असते आउटडोअर ब्रॉडकास्टिंग व्हॅन. त्यातल्या काहींचे चेहरे- भाव आम्ही कॅमेर्‍यात टिपतो. आणि गेल्या वर्षी टिपलेला अशाच एका चेहर्‍याचा फोटो आमच्या व्हॅनवर आम्ही लावला. आणि ही व्यक्ती आम्हांला यावर्षी पुन्हा भेटली. आपला फोटो बघून या वारकर्‍यांला खूप समाधान वाटलं. वारी आपण सहभागी झाल्याबद्दल धन्य तर मी झालो तसेच तुकोबांचे दर्शनचं झालं अशी प्रतिक्रिया या वारकर्‍यांने आयबीएन लोकमतकडे व्यक्त केली.

close