जोकोविच ठरला नवा चॅम्पियन

July 3, 2011 4:07 PM0 commentsViews: 1

03 जुलै

विम्बल्डन स्पर्धेला आज नवा चॅम्पियन मिळाला आहे. सर्बियाचा नोवाक जोकोविचने मेगाफायनल जिंकली. त्याने स्पेनच्या रफेल नदालचा पराभव करत विजेेतेपदाला गवसणी घातली. जोकोविचचं हे पहिलच विम्बल्डनचं विजेतेपद आहे. दोन्ही खेळाडू फॉर्मात असताना त्यापैकी कोण बाजी मारणार याची सगळ्याच टेनिसप्रेमींना उत्सुकता होती. पण जोकोविचने नदालवर मात करत सनसनाटी विजय मिळवला. जोकोविचने पहिल्या सेटमध्ये 6-4 अशी आघाडी घेतली आणि मॅचमध्ये वर्चस्व राखत दुसरा सेटही 6-1 जिंकला. याआधी रॉजर फेडररचाही क्वार्टरफायनलमध्ये पराभव झाला.

close