फोर्ब्सच्या यादीत मुकेश अंबानी पहिले

November 13, 2008 7:36 AM0 commentsViews: 7

13 नोव्हेंबरफोर्ब्सच्या यादीनुसार मुकेश अंबानी आशिया खंडातले सगळ्यात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. त्यांच्याकडे एकवीस अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. दुसर्‍या नंबरवर आर्सेलर ग्रुपचे लक्ष्मी निवास मित्तल आहेत. त्यांच्याकडे साडेवीस अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. तिसर्‍या क्रमाकांवर अनिल अंबानी यांचा नंबर आहे. त्यांच्याकडे साडेबारा अब्ज डॉलर्सची मालमत्ता आहे.पाचव्या क्रमाकावर डीएलएफचे चेअरमन के.पी. सिंह आहेत. जागतिक मंदीचा परिणाम या बड्या उद्योगपतींच्या संपत्तीवरही दिसतोय. मागच्या वर्षीच्या तुलनेत त्यांच्याकडच्या संपत्तीत साठ टक्के घट झाली आहे. या फोर्ब्सच्या यादीत 11 भारतीय अनिवासी-निवासी उद्योगपतींचा समावेश आहे.

close