पावसाने दांडी मारल्याने शेतकरी राजा हवालदिल

July 4, 2011 11:39 AM0 commentsViews: 23

04 जुलै

मृग नक्षत्र उलटून गेल्यानंतरही पावसाने दडी मारल्याने मराठवाड्यातील पेरण्या खोळंबल्या आहेत. पेरणीयोग्य पाऊस न पडल्याने आत्तापर्यंत केवळ तीनच टक्के पेरण्या झाल्यात.त्यातच खतांच्या तुटवड्याने शेतकरी हैराण झालेत. यापुढील काळातही पावसाने अशीच दडी मारल्यास त्याचा शेती उत्पादनावर विपरित परिणाम होणार आहे. मराठवाड्यात तीन जुलैपर्यंतच्या तुलनेत सरासरी अडतीस टक्के तर वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ नऊ टक्के पाऊस पडला.

मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. ज्यांनी पेरण्या केल्या त्यांना पिके जगविण्यासाठी तांब्याने पाणी द्यावे लागत आहे. झालेल्या पेरण्या वाया जाण्याची शक्यता आहे. उशिराने पाऊस पडल्यामुळे त्याचा शेती उत्पादनावर वाईट परिणाम होणार आहे.

मृगाच्या पावसावर अवलंबून असलेल्या मूग, उडीद, भूईमूग सोयाबीन या पिकांची लागवड तर घटणारच आहे. पण पाऊस अधिक लांबला तर ही पिकेच शेतकर्‍यांना घेता येणार नाहीत. दरम्यान पाऊस लांबल्यामुळे धरणसाठ्यातील पाणीसाठ्यातही घट झाली आहे. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी मराठवाड्यातील सर्व धरणातील पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेतला.

जुलै महिना सुरू झाला मात्र अजूनही महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाने दडी दिल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागात पावसाचा मोठा असमतोल दिसून आला आहेत. महाराष्ट्राच्या अनेक भागात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत. तर काही विभागात मात्र सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागातील पावसाची नेमकी काय स्थिती आहे ती..

मराठवाड्यातील स्थितीजुलै 2010 – 185 मिमी जुलै 2011 – 71.53 मिमीसरासरीच्या निम्माही पाऊस नाही

विदर्भातील स्थिती

जुलै 2010 – 60 मिमी. जुलै 2011 – 56 मिमी सरासरीपेक्षा थोडासा कमी परंतु समाधानकारक पाऊस

उ. महाराष्ट्रातील स्थिती

जुलै 2010 – 166 मिमीजुलै 2011 – 63 मिमी

close