लोकपाल विधेयक पावसाळी अधिवेशनात मांडणार !

July 4, 2011 9:28 AM0 commentsViews: 1

04 जुलै

लोकपाल विधेयक याच पावसाळी अधिवेशनात संसदेत मांडलं जाईल असं केंद्र सरकारने आज स्पष्ट केलं. पण त्यासाठी सर्व पक्षांनीच तयारी दाखवायला हवी असं ही सरकारने म्हटलं आहे. दिल्लीत काल सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत फारसं काही निष्पन्न झालं नाही. देशाला सक्षम लोकपाल विधेयकाची गरज आहे असा एका ओळीचा ठराव मात्र संमत झाला. लोकपाल विधेयक हे राज्यघटनेच्या चौकटीतच असावे असं सर्व राजकीय पक्षांना वाटत असल्याचे केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी सांगितले. पण, सरकार विधेयक आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

close