शिव वड्याचे ‘नामकरण’

July 4, 2011 12:11 PM0 commentsViews: 2

04 जुलै

मुंबईत शिवसेनेचा शिववडा विरुद्ध नितेश राणेंच्या छत्रपती वडापाव असं खमंग राजकारण पेटलं असताना आता महापालिकेने अनधिकृत स्टॉल्सवर कारवाई सुरू केली आहेत. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंनी पवईत शिववडा स्टॉलचे उद्घाटन केलं होतं. पण त्याच ठिकाणी नितेश राणेंनीही छत्रपती वडापाव सुरू केला होता.

वड्याला दिलेल्या या नावांवरुन आणि बाजूबाजूला उभ्या केलेल्या वडापावच्या गाड्यांमुळे वाद वाढला होता. त्यातच छत्रपती या नावाला उदयनराजेंनी आक्षेप घेतला. स्वाभिमान संघटनेला कोर्टात खेचण्याचा इशारा दिला.

त्यामुळे नावावरुन वाद नको किंवा काही आफत ओढवायला नको म्हणून शिवसेनेने आधीच शिव वड्याचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आणि रातोरात अंमलातही आणला. पवईमधील शिववड्याचे नाव बदलून आता अन्नदाता आहार केंद्र असं करण्यात आलं आहे. आता इतर ठिकाणी जिथे जिथे शिववड्याचे स्टॉल्स आहेत त्यांचं नावसुध्दा बदलण्यात येणार का हे अजूनतरी स्पष्ट नाही.

close