कर्तव्यदक्ष अधिकार्‍याच्या बदलीने नाशिककरांमध्ये संताप

July 4, 2011 9:56 AM0 commentsViews: 2

04 जुलै

नाशिक विभागाचे ऍन्टीकरप्शन खात्याचे पोलीस अधीक्षक हरिश बैजल यांची मुदतपूर्व बदली करण्यात आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. नाशिकमध्ये बैजल यांची कामगीरी अत्यंत उल्लेखनीय ठरली होती. महापलिकेचे उपायुक्त, दोन सिव्हील सर्जन, नगरचे सीईओ यांच्यासारख्या क्लास वनच्या अनेक भ्रष्ट आणि लाचखोर अधिकार्‍यांना त्यांनी गजाआड केलं आहेत.

लाचखोर अधिकार्‍यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात धडक मोहीम राबवल्याने उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यातील नागरिकांमध्ये एक विश्‍वासाची भावना निर्मण झाली होती. भ्रष्टाचाराला आळ घालण्यासाठी नागरिक स्वत:हुन पुढे येत होते अशावेळी मुदत पूर्ण होण्याच्या एक वर्ष आधीच बैजल यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

विशेष म्हणजे मॅटमध्ये सुध्दा त्यांच्या विरोधात निर्णय देण्यात आला. नाशिकच्या भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या वतीने या प्रकरणी अण्णा हजारे यांना लक्ष घालण्याची विनंती करण्यात आली आहे.

close