राज्यात दरोडेखोरांचा हैदास सुरूच 1 ठार, 3 जखमी

July 4, 2011 10:11 AM0 commentsViews: 6

04 जुलै

राज्यभरात दरोडेखोरांचा धुमाकूळ सुरूच आहे. अहमदनगर जिल्ह्यातील टाकळी लोणार इथं काल गलांडे वस्तीवर दरोडा घालण्यात आला. यात एक जण ठार झाला आहे. तर दोन जखमी झाले आहेत दत्तात्रय गलांडे असं मृत व्यक्तीचं नाव आहे. तर दुसरीकडे पालघर परिसरात काल रात्री दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. सफाळातल्या पाटील वाडयात रात्री साडेबाराच्या सुमारास दरोड्याचा प्रयत्न झाला मात्र लोकांनी आरडारोरडा केल्याने दरोडेखोर पळून गेले. नंतर सफाळा बस स्टॉप जवळ असलेल्या जगन्नाथ ठाकूर यांच्या घरावर दरोडा घालून चोरट्यांनी दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. या दरोड्यात एक जण जखमी झाला त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

close