आदर्शला जागा विलासरावांच्या आदेशाने !

July 4, 2011 2:04 PM0 commentsViews: 5

04 जुलै

वादग्रस्त आदर्श सोसायटीची जागा आपलीच आहे असा दावा राज्य सरकारने केला असला तरी 2007 पर्यंत या जागेला सीटी सर्व्हे नंबर देण्यात आला नव्हता. अशी खळबळजनक बाब आज उघडकीस आली. तसेच अजूनही महसूल खात्याकडे आदर्शच्या जमिनीचा नेमका सर्व्हे नंबर कोणता याविषयी ठोस कागदपत्र नाहीत असही स्पष्ट झालं.

आदर्शला ही जागा देण्याचा प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्याचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दिले होते. अशी साक्ष बृहन्मुंबईचे जिल्हाधिकारी चंद्रशेखर ओक यांनी दिली.

ही जागा संरक्षण खात्याच्या बेकायदेशीर कब्जात होती त्यावर अर्धवट भींतीच्या आवारात बगिचा उभारण्यात आला होता असंही ओक यांनी आपल्या साक्षीत सांगितले आहे. याखेरीज लष्कराने आदर्शच्या जागेला जी एनओसी दिली तीसुद्धा केवळ लष्करातील अधिकार्‍यांची सोसायटी बांधण्यासाठीच दिली होती असंही ओक यांनी साक्षीदरम्यान मान्य केलं. चंद्रशेखर ओक यांच्या या साक्षीमुळे आदर्शच्या सुनावणीला नवं वळण लागलं आहे.

close