बेळगावचे नाव बेळगावी ठेवण्याच्या विरोधात याचिका दाखल

July 4, 2011 11:12 AM0 commentsViews: 3

04 जुलै

कर्नाटक सरकारने बेळगावचे नाव बदलून बेळगावी असं वापरण्यास सुरुवात केली आहेत. या विरोधात सर्वेयार जनरल ऑफ इंडिया देहराडून यांच्याकडे याचिका दाखल करण्यात आली. बेळगावचे नाव बदलून बेळगावी असे करण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्र्यांनी फेटाळला होता.

मात्र तरीही कर्नाटक सरकारकडून बेळगावी या नावाचा सर्रास वापर होतो आहे. 2006 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री कुमारस्वामी सरकारने बेळगावसह कर्नाटकातील एकूण 11 शहरांची नावं बदलण्याची परवानगी मागितली होती. पण केंद्रीय गृहमंत्र्यांनी त्यांची ही मागणी फेटाळली होती. मात्र कर्नाटक सरकारकडून बेळगावातील सर्व सरकारी कार्यालयावर आणि अन्य ठिकाणी बेळगावी असा वापर सुरू केला.

close