तांदळाच्या मुद्द्यावरून छत्तीसगढमध्ये प्रचारयुध्द

November 13, 2008 7:49 AM0 commentsViews: 4

13 नोव्हेंबर, छत्तीसगडछत्तीसगढमध्ये मतदानासाठी आता केवळ 48 तास शिल्लक राहीले आहेत. या राज्यात तांदळाच उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. त्यामुळं तांदळाचा मुद्दा राज्याच्या निवडणूकीत नेहमीच महत्वाचा मुद्दा ठरलाय. यावेळी काँग्रेस आणि भाजपमध्ये याच मुद्यावरुन जोरदार प्रचारयुध्द भडकलं आहे. मात्र भाजपननं या आघाडीवरही काँग्रेसला मात दिली आहे.देशात सर्वाधीक तादंळाचं उत्पादन घेणार राज्य म्हणून छत्तीसगढ ओळखले जातं .राज्यातील निवडणुका नेहमीच तांदळाच्या मुद्द्याच्या आसपास फिरत असतात.यावेळीही तिच परिस्थीती आहे. मुख्यमंत्री रमन सिंग यांनी वर्षभराअगोदरच या मुद्द्याचं गांभीर्य ओळखलं आणि गरिबांना 3 रुपये प्रति किलो तांदूळ उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आणि. तो अमलातही आणला. हा निर्णयच भाजपला या निवडणूकीत तारून नेईल असं चित्र दिसत आहे. जो पक्ष गरिबीरेषेखाली राहणार्‍या लोकांना कमीत कमी किमतीत तांदूळ उपलब्ध करुन देईल, तो जिंकेल अशी परिस्थिती आहे. अर्थात काँग्रेस पक्षही या युद्धात उतरला आहे. काँग्रेसनंही निवडून आल्यास गरिबांना दोन रुपयात तांदूळ देण्याची घोषणा केली आहे. मात्र भाजपनं इथेही काँग्रेसला मात दिली. भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यात केवळ एक रुपये किलो प्रमाणे तांदूळ उपलब्ध करुण देण्याची घोषणा करण्यात आली आहे. आता छत्तीसगढच्या नागरिकांपुढ दोन पर्याय आहेत. ' भाजपनं कबूल केल्याप्रमाणे तीन रुपये किलो प्रमाणे तांदूळ उपलब्ध करून दिले. आता काँग्रेस वचननाम्याच काय करते ते बघायचं आहे ' अशी प्रतिक्रिया रती राम यांनी दिली.तांदळाच्या किमतीवरुन भाजप आणि कॉग्रेसमध्य युध्द भडकलंय. या घोषणायुध्दातून महागाईत भरडून निघालेल्या गरिबांना सध्यातरी दिलासा मिळतोय, पण सत्ता मिळाल्यावर यातल्या किती घोषणा प्रत्यक्षात येणार, हा प्रश्नच आहे.

close