नगसेवकाची अजब करामत पालिकेच्या दप्तरावर स्वत:चं लेबल

July 4, 2011 4:15 PM0 commentsViews: 4

04 जुलै

ठाणे महापालिकेच्या शिक्षणमंडळाने विद्यार्थ्यांना देण्यासाठी तयार केलेली दप्तर एका नगरसेवकाने चक्क स्वताचंच स्टिकर लावून विद्यार्थ्यांना वाटल्याचे उघड झालं आहे.उल्हासनगरमधील मनसेच्या पदाधिकार्‍यांनी हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर ठाणे महानगरपालिकेने असा प्रकार घडला नसल्याचे म्हटलं आहे.

उल्हासनगर महानगर पालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक राजेश वानखेडे यांनी गरीब शालेय विद्यार्थ्यांना दप्तरं वाटली. या दप्तरांवरील ठाणे महानगरपालिकेचे बोधचिन्ह हटवून वानखेडे यांनी स्वत:चं नाव आणि पक्षाच्या चिन्हाचे स्टिकर चिटकवले आहेत.

हा प्रकार मनसेच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला. दरम्यान मनसेकडून करण्यात आलेले सगळे आरोप बिनबुडाचे असल्याचं ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी सांगितले.

दरम्यान शिवसेनेवर होत असलेल्या आरोपानंतर महापौर अशोक वैती यांनी या संपूर्ण प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तर विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला यांनी नगरसेवक राजेश वानखेडे यांच्यावर गुन्हा नोंदवावा आणि शिक्षण मंडळ बरखास्त करावे अशी मागणी केली.

close