..त्यांनी 82 व्यावर्षी पीएच.डी मिळवली

July 4, 2011 4:20 PM0 commentsViews: 2

04 जुलै

आधी एम.ए. इन इकॉनॉमिक्स मग डिप्लोमा इन सोशल सायन्स अँड जर्नालिझम त्यानंतर एमबीए, मग डिप्लोमा इन बिजनेस मॅनेजमेंट आणि आता वयाच्या 82 व्या वर्षी पीएच.डी. हे रेकॉर्ड आहे. पुण्याच्या मोरेश्वर अभ्यंकर यांचं. त्यांचा उत्साह आणि इच्छाशक्ती सगळ्यांनाच प्रेरणा देणारी आहे.

मूळचे नागपूरचे असलेले मोरेश्वर अभ्यंकर हे अनेक वर्ष प्रशिक्षण क्षेत्रात काम करून निवृत्त झाले. मात्र आपण देत असलेल्या प्रशिक्षणाचा कंपन्यांमधील कर्मचार्‍यांना खरोखरच फायदा होतो का असा प्रश्न त्यांना पडला. आणि मग याच विषयावर त्यांनी पीएच.डी करण्याचा ध्यास घेतला.73 व्या वर्षी त्यांनी पीएच.डी साठी पुणे विद्यापीठात नोंदणी केली आणि नुकतंच म्हणजे वयाच्या 82 व्यावर्षी त्यांच्या प्रबंधावर पीएच.डी ची मोहोर उमटली.

close