मनमाडमध्ये 11 दिवसांनी पाणी पुरवठ्याने नागरिक हैराण

July 4, 2011 12:35 PM0 commentsViews: 6

04 जुलै

भर पावसाळ्यात मनमाड शहरात 11 दिवसांनी पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यामुळे मनमाडमधील प्रत्येक नागरिकाला पाण्याची आतुरतेने वाट बघावी लागत आहे. एक दिवस दोन तास मिळणार्‍या पाण्यावर 10 दिवस काढावे लागत आहेत. पाणीपुरवठा करणार्‍या वागदरडी धरणातील पाणी संपले आहेत.

वागदरडीमध्ये फक्त 50 दशलक्ष घनफुट पाणी शिल्लक आहे. पालखेड धरणातूनही मिळणारे पाणी पावसाअभावी बंद झाला. पाटोदा साठवण तलावाची क्षमता अपुरी पडत आहे. दोन वर्षापूर्वी मनमाड पाणी पुरवठा योजनेसाठी 38 कोटी रु मंजूर झाले त्यातील 7 कोटी रुपये महापालिकेत येऊनही पडलेत मात्र मनमाडकरांचे पाणी कपातीचे दिवस वाढत चाललेत.

close